लग्नाची वरात निघाली की ती देवळांत आधी नेतात नंतर वेदीवर येते. ह्या बाबत आमच्या शाळेतल्या मराठी शिक्षिकेने अतिशय सुरेख विवेचन केल्याचे आठवते. - पुर्वीच्या काळी हॉटेल्स, लॉज वगैरे प्रकार नव्हते. मुलीचे लग्न बाहेरगांवी जमल्यास वरात घेऊन नवरदेवा कडील मंडळी गांवात यायची. आल्यावर त्यांना उतरण्यासाठी बहुदा गांवाच्या वेशीवरच्या एखाद्या देवळांत सोय केली जायची. ही प्रथा हळूहळू बदलली लग्नाचे हॉल व हॉटेल्स वगैरे मुळे देवळांत राहण्याची आवश्यकता नाहीसी झाली पण वरात देवळांत जाऊन मग वेदीवर चढण्याची प्रथा मात्र कायम राहिली....... खरं खोट देव जाणे !
बरेच शब्द प्रयोग ही शिक्षिका कारणांसहित समजवून सांगायची.... उदाः- दिवा 'पेटवा' हा शब्द प्रयोग चुकीचा आहे दिवा 'लावा' हा बरोबर आहे कारण पेटवतात ती चिता व वंशाचा दिवा लावायचा असतो.
माधव कुळकर्णी.