लग्न करण्यासाठी वय महत्त्वाचे की शारीरिक विकास? मानसिक तयारी की मानसिक घुसमट?!

साधारणतः १२-१४ व्या वर्षी मुली-मुलगे शरीरसंबंध ठेवण्यास व स्वाभाविकपणे प्रजनन करण्यास सक्षम होतात.त्या दृष्टीने त्या वयात त्यांचा शारीरिक विकास झालेला असतो‌. शरीरात नव्याने बागडू लागलेल्या  संप्रेरकांमुळे  हा अनुभव घेण्यास त्यांची मानसिक तयारीच काय, मानसिक उत्सुकताही असते.परंतु लग्न म्हणजे केवळ शारीरिक संबंध का? मुळ प्रश्न हा आहे की या वयात लग्नाची सर्वांगीण  जबाबदारी ते  घेऊ शकतात का?नव्हे,ती  त्यांना पूर्णपणे समजते का?  केवळ शरीरात व मनात  संगमोत्सुक  लहरी दौडू  लागल्या  की त्यांना  आवराया  लागू नये  म्हणून या  अल्पवयीन मुला-मुलींना  "लग्न" करू द्यावे का?
गुजराथ मध्ये नवरात्रीनंतर MTP चे प्रमाण किती असते हे मी स्वतः पाहिले आहे..

पुन्हा सांगतो, माझा मुद्दा त्यांच्या शरीरसंबंधांचा नसून लग्नाच्या वयाबाबत अस्तित्वात असलेल्या कायद्याचा व तो न्यायाधीशाकरवी पायदळी तुडवला जाण्याचा आहे.
ह्याला आपण पुरोगामी म्हणणार का ?
  मी लेबलांना महत्त्व देत नाही.आपल्या देशात कुठल्याही गोष्टीला वा व्यक्तिला लेबल लावून त्याला एका साच्यात बंद करण्याचा रिवाज आहे.असं केलं की त्या गोष्टीची चिकित्सा करण्याची ,त्यावर विचार करण्याची आपल्याला गरज वाटत नाही. पुरोगामी, प्रतिगामी, उजवा,डावा, साम्यवादी,भांडवलदार,उच्च,नीच,हिंदू, मुसलमान,इत्यादी शब्द शिवीसारखे वापरायचे की झालं.तेव्हा माझी विनंती आहे की आपण ही लेबलं बाजूला ठेवून चर्चा करूया.

मिलिंद