वा विनायकरराव!

अलंकाराचा सागर असे ज्यास म्हणता येईल अश्या ज्ञानेश्वरीमधून आपण निवडून आणलेली ही रत्ने भूषणावह आहेत.

दृष्टांतामधील चित्रे उलट्या क्रमाने आली तर अर्थांतरन्यास होतो असे म्हणता येईल का? ज्ञानेश्वरीत असे अर्थांतरन्यास असतीलच ना? उदा० - १८ व्या अध्यायाच्या शेवटी असे काहीसे आहे का?

शंभु तेथे अंबिका, चंद्र तेथे चंद्रिका
संत तेथे विवेका, असणे की जी
...
योगेश्वर जिथे कृष्ण जिथे पार्थ धनुर्धर
तिथे श्री विजय भूती नीती मती इत्यादी (मूळ ओळी काय आहेत?)

मृदुला, मीराताई, आपण दिलेली उदाहरणे छान आहेत! स्वभावोक्ती हा अलंकार मुख्यतः 'अतिशयोक्ती' आणि 'व्याजोक्ती' ह्यांच्या तुलनेत बघितला जातो असे वाटते.  

आपला
(अलंकृत) प्रवासी