प्रिय प्रशासक महाशय,
नमस्कार,
माझे एक संकेतस्थळ आहे जिथें सध्या मी फक्त श्री "ज्ञानेश्वरी" व श्री "दासबोध" घालून ठेवलेले आहे. दोहोंचे unicode मध्ये रुपांतर करणे सोपे आहें. श्री 'ज्ञानेश्वरी'चे काम श्री विनायक करतातच आहेत. आपली हरकत नसल्यास 'पुस्तके' ह्या सदरासाठी माझा श्री 'दासबोध' पाठवावे असा मानस आहे. ग्रंथ मोठा असल्यामुळे कसा पाठवावा याबद्दल कांही सूचना द्याल का ? संपूर्ण 'दासबोध' एकदम पाठवायचे झाल्यास त्याचा साईझ १.४२ MB एवढा होतोय. तो मी rediffmail किंवा yaahoo-mail नें पाठवूं शकेन.
आणखीही बरेच लेखन करून ठेवले आहे, उदा. अर्थासहीत- भगवद्गीता, अष्टावक्रगीता, कांही उपनिषदे वगैरे. पण माझे संकेतस्थळाला थोडासा आकर्षक आकार यावा यासाठी कांही प्रयत्न चाललेत, ते झाल्यावर घालेन म्हणून थांबलोय. ह्यापैकीही कांही पाठवायला मला आवडेलच.
ह्याआधी मी "सर्वसारोपनिषत्" पाठवले होते. विष्णुसहस्रनामाचे शंकराचार्य-भाष्याधारे प्रत्येक नामाचा अर्थ लिहिण्याचा विचार होता. एक लेख पाठवलाही. पण ह्या दोहोंची अवलोकने/प्रतिसाद बघता आणखी कांही लिहायची हिम्मत होत नाही. असो.
आपण सुरू केलेल्या 'मनोगत' संकेतस्थळाबद्दल लिहावे तेव्हढे थोडेच. घटका - पळी तो वृद्धिंगत होत जावो हीच सदिच्छा.
कलोअ,
विश्वास भिडे -