चिपोटले म्हणजे वाळविलेल्या हलाप्यिनो मिरच्या.
साध्या साल्सामध्ये हलाप्यिनो किंवा सोरॅनो जातीच्या हिरव्या मिरच्या असतात. हलाप्यिनो मिरच्या जाड सालीच्या असतात त्यामुळे साध्या उन्हात त्या चांगल्या वाळत नाहीत. त्या सडायला सुरुवात होत. त्यामुळे त्या टिकविण्यासाठी त्या (लाकडाच्या) धुरावर वाळवतात. या प्रक्रियेला स्मोकिंग असे म्हणतात. अशा वाळवलेल्या चिपोटले रंगाने काळपट किरमिजी (कॉफीसारख्या) असतात. [सामन मासे, तसेच बीफ जर्की हे अशा धुराने वाळविण्याच्या प्रक्रियेचे काही पदार्थ आहेत.]
चिपोटले साल्सा करताना जवळ जवळ सगळी साध्या साल्साचीच कृति आहे, फक्त हिरव्या मिरच्यांऐवजी चिपोटले मिरच्या वाटून घालाव्या. तसेच साधे (गोल) टोमॅटो न घेता लांबट आकाराचे रोमा टोमॅटो घ्यावे.
कलोअ,
सुभाष