मिलिंद,
शारीरिक बदलानुसार आणि गरजांनुसार मानवी सोय करणे हाच हेतु असावा रुढी किंवा कायदा, चालीरिती बनवण्याचा. ब्रह्मचार्याश्रमाचा मुळ उद्द्येश्य असावा की शारीरिक संप्रेरकातून होणारे बदल लक्षात घेवूनच त्या प्रेरणेचा शारीरिक विकासासह गृहस्थाश्रमाच्या जबाबदाऱ्या पेलण्यास समर्थ करणे. ज्यासंदर्भात हा विषय आला तो विषय वेगळा होता. बालविवाह नव्हता.
श्री. विनायक यांच्या खालील प्रतिसादात उल्लेख केल्यामुळे प्रतिगामी / पुरोगामी असा शब्द वापरला गेला माझ्याकडून.. लेबलं लावण्याचा इरादा नव्हता.
२. अल्पवयीन मुलामुलींना लग्नाचा अधिकार देणे हा खरोखर प्रतिगामी निर्णय आहे, त्याचे कोणतेही समर्थन होऊच शकत नाही.
अल्पवयीन मुलांच्या लग्नाला परवानगी देवू नये हे मान्य असले तरी त्यांच्या ह्या शारीरिक बदलांबाबत आपण किती जागरुक आहोत आणि त्या बदलांना कसे प्रवाहित करतो हेही पाहणे आपली जबाबदारी नाही का?
शारीरिक संबंधांना हरकत नाही असे म्हणून आपण "जबाबदारी" पार पाडतो का? किंवा condoms वाटून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडल्याचे पुण्य हवे आहे का? मुळात आपण अजूनही मुला-मुलींना त्यांच्या लग्नाबाबत संपूर्ण स्वातंत्र्य देतो का? २५-३० वर्षे वय होवूनही एखादी मुलगी आपला जोडीदार निवडू शकत नसेल तर मग...लग्न करुन जबाबदारी घेण्यास सक्षम आहे हे ठरवण्याचे निकष कोणते असावेत? वय की शारीरिक क्षमता? पुस्तकी ज्ञानातून मिळवलेली पदवी की प्रसंगाला सामोरे जाण्याची मानसिक/ शारीरिक क्षमता ??
           कायदे हे मानवनिर्मितच आहेत ना? मग ते बनवतांना कोणते आधार घेतले जातात? स्थळ-काळ,प्रसंग आणि व्यक्तिसापेक्ष निर्णय बदलू शकतात असे गृहीत का धरु नये ? आणि तसे दिले गेलेले निर्णय त्या चौकटीतच का तपासले जावू नयेत ?