कांदा-मेथीचा खुडा आठवला. आमच्याकडे खानदेशात पटकन काही साईड डिश बनवायची असल्यास, कांद्याची पात व मेथी बारीक चिरून त्यावर थोडे तेल, लाल तिखट व मीठ टाकतात. पातीचे कांदे बारीक गोल चिरून त्यात टाकतात. हे मिश्रण हाताने एकजीव करावे.  मेथी व कांद्याची पात कोवळी असावी लागते. खानदेशी वांग्यांच्या भरता बरोबर हा 'खुडा' मस्त drooling लागतो.  तळलेल्या ज्वारीच्या पापडावर (बिबडे) घेऊन खाण्यातही मजा येते. शेतकऱ्यांना शेतावरच भाकरी बरोबर खायला ह्या 'डिशेस' बनवणे  अधिक सोप्या पडत असाव्यात म्हणून त्यांचा उगम झाला असेल !

माधव कुळकर्णी.