एकदा आपल्याला काहीच कळत नाही हे लक्षात आल्याने हताश होऊन तो आत्महत्या करण्यासाठी पुलावर जातो. हे पाहून त्याचा मित्र त्याला वाचवतो व यामागचे कारण विचारतो.
"मला काहीच कळत नाही..." तो
"अरे असं कसं? बघ मी तुला एक प्रश्न विचारतो. तू याचं उत्तर नक्की देशील" त्याचा मित्र.
"आता अस्सं बघ.. अंडाकृती आहे, बाहेरून पांढरं आहे, आतून पिवळं आहे ते काय?"
बराच विचार करून तो हैराण! "नाही बुवा सुचत, सांग तूच... मला काहीच कळत नाहीये"
"अरे अस्सं काय करतोस, अंडं!, असो मी तुला आणखी एक प्रश्न विचारतो, हे तुला नक्की जमेल, नाही जमलं तर तू तुला वाटेल ते करायला मोकळा. नीट ऐक. असं काय आहे जे अंडाकृती आहे. बाहेरून पांढरं आहे, आतून पिवळं आहे, ज्याचे आपण डबल ऑम्लेट बनवतो?"
पुन्हा तो हैराण... त्याची चुळबूळ वाढते...शेवटी तो म्हणतो, " नाही यार, हे ही येत नाही मला मी आत्महत्या करतोच कसा!"
त्याला कसं बसं रोखत त्याचा मित्र म्हणतो, "अरे काय हे? उत्तर सोप्पं आहे, 'दोन अंडी'! आता याहूनही सोप्पा प्रश्न विचारतो, ही शेवटची संधी दे मला, ठीक?"
"ठीक"
"अस्सं काय आहे जे चार पायावर चालतं, डोळे मिटून दूध पितं आणि म्यांव म्यांव करतं?"
यावर क्षणाचाही विलंब न करता तो उत्तरतो "तीन अंडी!"
(यानंतर त्याच्या मित्राने पुलावरून खाली उडी घेतली.)
(समाजविशिष्टाऐवजी स्वतःचे नाव वापरून विनोद सांगुन पाहा, विनोदातला निखळपणा वाढेल. अगदीच जमले नाही तर 'त्या'चे नाव वापरा.)