- मी कांदे ३/४ लिहिले आहेत ते तीन चतुर्थांश नसून ३ किंवा ४ कांदे- मध्यम आकाराचे - आपल्या आवडी/ गरजे प्रमाणे घेणे.
- कैरी किसताना कैरी मधोमध उभी कापून कोय काढून टाकावी व कोयीच्या भागाकडून किसायला घ्यावी म्हणजे किसल्यावर साल आपोआपच वेगळे होईल (साल काढायची आवश्यकता नाही)
- हळदीने रंग येतो पण आवडत नसल्यास वापरली नाही तरी चालेल
- ह्या पदार्थाला फोडणी देत नाहीत - आई तरी देत नाही; पण एकदा प्रयोग करून बघायला हरकत नाही.
माधव कुळकर्णी.