- प्रत्येक मराठी माणसाच्या घरी एक तरी दैनिक, मासिक आले पाहिजे.
- प्रत्येक मराठी माणसाने आजुबाजूच्या मराठी शाळांचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- आपल्या घराचे, सदनाचे, सदनिके चे, प्रासादा चे नांव आवर्जुन मराठी मध्ये लिहले पाहिजे.
- घरामधे आपले स्वताचे एक छोटे से वाचनालय बनविले पाहिजे.
- आपल्या आजुबाजूला असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचा पुरेपूर लाभ घेतल पाहिजे.
- आपल्या संपर्कात येना-या व्यक्ति शी आवर्जून मराठी मधे बोलले पाहिजे.
- आपल्याला संत, पंत आणि तंत कवी यान्च सम्रूध्द असा वारसा लाभलेला आहे. आपण किमान १००/१५० ओव्या, पोवाडे, ष्लोक, कवीता यांचे अवांतर पाठांतर केले पाहिजे.
- नाटके, कथा, कादंब-या यान्चे घरामधे बसुन सामुहिक वाचन करुन रसास्वाद घेतला पाहिजे.
- आपण आपले अनेक सणवार साजरे करीत असतो, जसे गौरी, गणपती, सन्क्रांत, तीळ-गुळ वगैरै. त्यामधे आवर्जुन पणे आपण ईतर परप्रांतियांना याना सामील करुन घेतले पाहीजे.
- महाराष्टीयन माणुस त्याचे सहकार्यशील प्रतिमेबद्दल कधीही प्रसिध्द नव्ह्ता. परन्तु आता मात्र त्याने आपली प्रतीमा बदलण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न केला पाहीजे .
- आपल्या भोवताली अनेक सभांरंभ होत असतात, त्यामधे आपण उत्साह आणि मनपुर्वक सहभाग घेतला पाहिजे, अगदी, तन-मन-धनाने.
जय महाराष्ट्र.
द्वारकानाथ.