प्रभाकर,
कोंबडी केली ! मस्तच झाली होती. आलं लसूण ची पेस्ट चिकन चे तुकडे धुतल्यावर त्याला चोळली व बाकी कृती आपण सांगितलेल्या पद्धतीने केली. चिकनचे तुकडे १५/२० मिनिट परतले (लाल होई पर्यंत) व मग त्यावर कांदा खोबऱ्याची पेस्ट टाकली -
सोबत आपणच येथे दिलेला - प्रॉन्ज पुलाव व सोल कढी होती.... माझे दोघे 'शेट्टी' मित्र आले होते - त्यांनी तर प्लेट चाटून पुसून संपवली. प्रॉन्ज पुलाव मध्ये जरा गडबड झाली पण वेळ निभावून नेता आली. परत प्रमाण कमी करून बनवून बघेन - हे केले सर्व सौ. ने; मी उगीचच भाव खातोय !
माधव कुळकर्णी.