ज्ञानदेवांच्या हरिपाठावरील निरूपण रसाळ आहे. वाचतांना आनंद वाटला.
तुमचा अभ्यास चांगला आहे असे दिसते. विवेचनाला खोली आहे, उथळपणा नाही.त्यामुळे वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य तुमच्या निरूपणात आहे, असे वाटते.

"ध्यान म्हणजे कृत्रिम स्थिती आहे"

 हे आपले विधान आणि त्या अनुषंगाने आपण केलेले युक्तिवाद अजिबात पटले  नाहीत.  ध्यान ही एक सहजावस्था आहे.

"तत प्रत्यैकतानता ध्यानम् !" ही ध्यानाची व्याख्या आहे,तर ते कृत्रिम कसे?

लोकहितवादी