माधव,

फोडणीच्या भाताची पाककृती सुंदर, सुटसुटीत आहे.

मी करतो तेंव्हा घटक पदार्थ एवढे नसतात. कांदा, हळद, मिरच्या, मीठ, साखर आणि भाजलेले शेंगदाणे एवढेच जिन्नस वापरतो.

हेच जिन्नस वापरून आणि भाजलेल्या शेंगदाण्या ऐवजी भरपूर ओले खोबरे वापरून फोडणीची पोळीही सुंदर होते. शिळ्या पोळ्यांचे तुकडे मिक्सर मध्ये फिरवून परतायचे. वर पाण्याचा हबका मारायचा. बऽऽऽस! 

फोडणीच्या भाताची दुसरी एक पाककृती आहे.

एका ताटात शिळा भात पसरून त्यावर कच्चा कांदा बारीक चिरून, हळद, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, कोथिंबीर घालायची. त्यावर मोहरी, कढीपत्याची फोडणी वरून द्यायची आणि भात कालवून, फोडणीचा थंड भात खायचा. (दही नको) कच्चा कांदा, कच्ची हळद, कच्च्या हिरव्या मिरच्या आणि कच्ची कोथिंबीर....... ही चवही खूप छान लागते. वरून लिंबू पिळल्यास उत्तम.