"मनोगत"च्या मुखपृष्ठावर हा पदार्थ "ताज्या पदार्थां"च्या यादीत दिला गेला आहे. कालच्या शिळ्या भातापासून केलेला पदार्थ हा "ताजा पदार्थ" कसा होऊ शकतो?

- टग्या.

ता.क.: अशाच प्रकारे कालच्या शिळ्या पोळीची फोडणीची पोळी पण बनवता येते. तसेच (ताज्या अथवा शिळ्या) ब्रेड*पासून फोडणीचा ब्रेडही बनवता येतो.

* "ब्रेड" ऐवजी "पाव" हा मराठी शब्द का वापरला नाही, असा कोणी जाब विचारण्यापूर्वीच असे नम्रपणे नमूद करावेसे वाटते, की "ब्रेड"इतकाच "पाव" हाही परभाषीय (व तितकाच युरोपीयभाषीय) शब्द आहे. "ब्रेड" हा शब्द आंग्लभाषीय आहे म्हणून आक्षेप घेणाऱ्यांना खरे तर "पाव" हा पोर्तुगीज शब्दही तितकाच आक्षेपार्ह असावा. पाव, बटाटा, अननस, साबण, नाताळ, मेज हे शब्द काही मुळातले आपले नव्हेत - ते आपण पोर्तुगीज भाषेतून घेतले. मग इंग्रजी शब्दांना तेवढा आक्षेप, आणि पोर्तुगीज शब्द मात्र चालतात, हा दुहेरी न्याय का?