माधव,
धन्यवाद. कोजागिरीची मस्कत मराठी मित्र मंडळाची १७५ जणांची Order होती ती पुरी करूनच कृती दिली आहे.
रोहिणी,
मला स्वतःलाही 'केशरी दूध' हेच नांव आवडते. माहेरच्या चांगल्या पद्धती सासरीही चालू करण्यास काय हरकत आहे? करून पाहा, नवरोबा खूश होतील.
मी तरी इथून स्पॅनिश केशर घेऊन जातो. बरेच दिवस टिकते आणि स्वाद आणि रंगा अत्युत्तम आहे. भारतात कुठले कुठले ब्रँड्स मिळतात आणि त्यातले कुठले अस्सल आणि कुठल्यात लाकडाचा भुसा रंगवून मिसळलेला असतो हे माहित नसल्यामुळे इथल्या भरवशाच्या केशरावर नितांत प्रेम करतो.
इथेही गायीचे दूध असल्या कारणाने आटवणे, साय धरणे असे प्रकार सहजी संभवत नाहीत. त्यामुळे आटवण्याच्या भानगडीत न पडता त्यात काजू, बदाम, पिस्त्याच्या पावडरचे प्रमाण कमी-जास्त करून दुधाला दाटसरपणा आणावा.
सुवर्णमयी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आधीच दूध, त्यात साखर आणि त्यात सुकामेवा असल्यामुळे केशरी दुधाचा उष्मांक बराच वर जातो त्यात आणखीन क्रीम कशाला? चव नक्कीच वाढेल, ......पण त्या बरोबर वजनही. सांभाळून.