मला वाटते हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. याला एक असे उत्तर असू शकत नाही.

भ्रमणसंचात कॅमेरा, जीपीआर्एस्, एम्एम्एस् यांची गरज आपल्याप्रमाणे बऱ्याच जणांना वाटत नसेल, तसेच काही जणांना या गोष्टी गरजेच्या वाटतही असतील. (किंवा काही जण गरज नसली तरी परवडण्यासारखे असेल तर हौस म्हणून देखील या गोष्टी घेत असतील.) ज्यांना घ्यायचे त्यांना घेऊ देत. आपल्याला नको असेल तर घेऊ नये. आपल्या गरजा काय आहेत आणि कशासाठी किती पैसे खर्च करायचे (याचा ऐपतीशी काहीही संबंध नाही) हा सर्वस्वी आपला निर्णय आहे. केवळ इतर लोक घेतात म्हणून (परवडत असेल तरीही) एखादी गोष्ट आपण घेतलीच पाहिजे, असे थोडेच आहे? तसेच दुसऱ्याने ती घेतली तर ते त्याच्या गरजेचे अथवा योग्य आहे का, हा त्या दुसऱ्या व्यक्तीचा प्रश्न आहे, नाही का?

तसेही या सर्व (काहींच्या मते अनावश्यक) सुविधा नसलेले भ्रमणसंचसुद्धा बाजारात सहसा उपलब्ध असतात, तेव्हा आपल्याला हव्या तेवढ्याच सुविधा असलेला भ्रमणसंच कोणत्याही बाह्य दबावाला बळी न पडता घ्यायची पूर्ण मुभा आपल्याला आहे.

बऱ्याचदा फोन कंपन्यासुद्धा असे (जास्तीच्या सुविधा असलेले) संच जास्त काळाच्या बोलीवर (लाँग टर्म काँट्रॅक्ट) फुकट देतात (निदान इथे अमेरिकेत तरी असे होते, भारतात होते की नाही ते नक्की माहीत नाही.), म्हणून गरज नसली, तरी एवीतेवी फुकटच मिळतोय, का घेऊ नये, म्हणूनही असे संच घेतले जातात. पुन्हा हा ज्याचात्याचा प्रश्न आहे; यात काहीही गैर नाही.

- टग्या.