एका भ्रमणदूरध्वनी उत्पादकाबरोबर काम केल्यामुळे मी यावर काही भाष्य करू इच्छितो.

भ्रमणदूरध्वनीच्या या सुधारणा किंवा त्यातील सुविधा का आहेत याच्या मागची भूमिका समजावून घेतल्यास ह्या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे सापडतील. सध्या जगभरात(भारतापुरते सीमित राहू नका...) सर्वात जास्त भ्रमणदूरध्वनीचा वापर जर कोणी करत असेल तर ती आहे Teenager (कृपया मराठी शब्द सुचवा) (वयोगट सुमारे १६-२२ वर्षे) पिढी. यामुळे, कॅमेरा, जीपीआरएस, वगैरे गोष्टींचा ते पुरेपूर उपयोग करतात. काही दिवसात तर तुम्हाला भ्रमणदूरध्वनीवर टी.व्ही. पण पाहता येणार आहे.  आता किती Teenagers भ्रमणदूरध्वनी वापरतात हे पाहायचे असेल, तर कुठल्याही उत्पादकाच्या सेल्स प्रतिनिधीला विचारा. आश्चर्य वाटेल पण जवळजवळ ९०-९५% गिऱ्हाईक हे Teenagers आहेत. यामुळे, या गोष्टींची तुम्हाला गरज नसली तरी तुमचा विचार दूरध्वनी उत्पादक करणे मुष्किल आहे, कारण तुम्ही त्यांच्या ५-१०% गिऱ्हाईकामध्ये येता.  आता 'या गोष्टींचा कोणी वापर करतो का?' या प्रश्नाचे उत्तर सापडले.

दुसरा प्रश्न 'पैसे वाया जातात का?' तर यासाठी जर त्या सुविधांचा वापर केला तर असे वाटणार नाही. जर एवीतेवी या सुविधांकरता पैसे भरायचेच, तर मग वापरा. ज्यांच्यासाठी या सुविधा आहेत ते त्याचा भरपूर वापर करतात हे मी वर सांगितले आहेच.

--ध्रुव.