लोकहितवादी,
आपला अभिप्राय / प्रतिसाद वाचला. भावनगर येथील स्वामींच्या अभ्यासवर्गात ध्यानाची जी प्रक्रिया शिकवली जात असे त्यावरून माझी ही भूमिका झाली आहे. ध्यानात असताना "वृत्तीलय" होतो. पण तो तात्पुरता असतो. (मला हा शब्द temporary ला पटकन आठवला नव्हता. मी तात्कालिक असा शब्द वापरला होता. पण तो चुकीचा आहे हे जाणवल्यानंतर तशी सुधारणा प्रशासकांना करायला सांगितली होती.)
ध्यानात असेतोवर वृत्तीलय होतो. परत देहावर आणि व्यवहारात आल्यानंतर वृत्तींचा त्रास होतोच. वृत्ती नाममय झाली की हा त्रास नाही असे मला वाटते. म्हणून सहजावस्था असावी . सध्या मी आपल्या मनात विचार/ वृत्ती कशी येतात ह्यावर विचार करतो आहे. चित् जर सत् ला चिकटून राहिले किंवा आकाराला न व्यापता राहिले तर मग वृत्ती / विचार येण्याची शक्यता कमी असे मला वाटते. ध्यानात हेच अपेक्षित असते.पण हे सर्व काळ शक्य आहे का ? म्हणून मला ती तात्पुरती स्थिती वाटते. कृत्रिम हा शब्द कदाचित खटकणारा असावा.
जे काही लिहितो आहे ते संदर्भ ग्रंथ आणि त्याचे लेखक ह्यांच्या आधाराने. ज्यांच्या खांद्यावर बसले की दूरचे पाहू शकतो असे खांदे मिळणे हे भाग्य लाभणे ही ईश्वराची कृपा!
आपल्यासारखे वाचक लाभणे हे सौभाग्यच! ह्यातून काही चांगले निर्माण होवो हिच सदिच्छा !