श्री. परखड महोदय,
आपले विचार उत्तम आहेत. आम्ही ज्यांना खास करून फक्त वाचनाची जास्त आवड असते, त्यांना प्रतिसाद देतानाही गडबडून जायला होते. मग "गमभन" व "टंकलेखन" सहाय्यक वापरून कसे तरी प्रतिसाद पुरे करावे लागतात. ह्याच प्रतिसादाचे उदाहरण देण्याचे झाल्यास; प्रतिसादात घालवलेला वेळ जर आम्ही वाचनांला दिला असता तर चार लेख वाचून संपवले असते. त्यातच "गमभन" च्या खिडकीवर मी क्लीक केले की माझा संगणक मृत होतो. किंवा एरर येते. म्हणून सारखे "गमभन" वापरायची भिती वाटते. कोणाला ही फुसकी कारणे वाटतील, पण प्रतिसादांत शुद्धलेखनांची अट शिथील करावी म्हणजे आमच्या सारख्या नवशिक्यांना सोयीचे पडेल.
गमभन चे चित्र काही जण बरोबर चिकटवतात पण माझे का येत नाही तेही कळंत नाही.