गार्गी,

जायफळाचा वापर (वेलची बरोबर) मी फक्त कॉफीत केला आहे. केशरी दुधात केला नाही.
प्रयत्न करून पाहावयास हरकत नाही. पण अगदी अल्प प्रमाण असावे. स्वादात केशर-वेलची-जायफळ असे उतरत्या भाजणीत वापरावे. दुसरे, जायफळ वापरले तर केशरी दूध गरमच प्यावे. थंड दुधात जायफळ तितके चांगले लागणार नाही. पण जायफळ नसेल तर केशरी दूध थंड किंवा गरम कसेही चांगले लागते.