नमस्कार.
खूप दिवसांपासून एक शंका अनुत्तरित आहे. तिचे निरसन झाले तर शतशः आभारी असेन !
मनोगतावर मजकूर प्रकाशित करताना त्यामधे चित्रे कशी अंतर्भूत करायची ? आणि
चित्रे अंतर्भूत करताना त्यांचे आकार आणि संख्या यावर मर्यादा आहेत का ?
काही अतिरिक्त "हटमल" बंदिशी (टॅग्स्) लिहाव्या लागत असल्यास नक्की कोणत्या बंदिशी ?
आपला,
(कृपाभिलाषी) केदार.