बहुतेक वेळी श्रद्धा आणि अन्ध्श्रद्धा यात सामान्य आणि स्व-धऱ्माचे पुरेसे ज्ञान नसल्याने गल्लत होते. हिन्दू धर्म हा मुळात अन्धश्रद्धान्चा धर्म नाही. रूढी आणि परम्परा यामुळे मात्र सनातन हिन्दू धर्मास नावे ठेवली जातात. लक्शात घेण्यासारखी गोष्ट आहे, हा धर्म अध्यात्मावर आधारित आहे. अध्यात्म शास्त्र पराकोटीचे पावित्र्य आणि शुद्धत्वावर भर देते. ह्यामुळे अर्थातच आचार विचारास अनन्यसाधारण महत्व होते, किम्बहुना अजुनही आहे. उदा. कपाळावर कुन्कू अथवा गन्ध नसल्यास ती व्यक्ती सूतकात आहे, अथवा अशुद्ध स्थितीत आहे असे समजावे असा सन्केत आहे.

कालान्तराने मुळ उद्देश विसरल्याने त्यामागिल तत्व विसरून श्रद्धाच अन्धश्रद्धा म्हणुन पुढे आल्या असाव्यात असे मला प्रामाणिक पणे वाटते. लहान तोन्डी मोठा घास घेतला आहे. तरीही माज़्ह्याही ज्ञानात भर पडावी म्हणून...

समीर शुक्ल