कूर्जेट ही भाजी मी प्रथम इथे इंग्लंडातच पाहिली. घोसाळ्याच्या आणि दुधीभोपळ्याच्या मधला काहीतरी प्रकार आहे असे वाटते. माहजुबाच्या सारणात कुठल्याही भाज्या घातलेल्या चालतात. (मी कृतीत अल्जीरियन लोक सहसा वापरतात ती भाजी दिली आहे.) गोड सारण (उदा. मुरांबे) वापरूनही माहजूब करता येतात.