ही वेगळीच पाककृती जरा वेळखाऊच आहे, त्यामुळे सवडीने करून बघायला हवी. कोणत्याही भाज्या चालतात हे बरे आहे. म्हणजे भाजीबाजारात विशिष्ट भाजी मिळवण्यासाठी आणखी वेळ जायला नको. त्यात भाजून करायची असल्याने मेदवृद्धीची चिंता नसली तरी रवा भिजवताना भरपूर तेल घालावे लागते असे दिसते, त्यामुळे चिंता आहेच.
वेगळाच पदार्थ दिल्याबद्दल धन्यवाद. आणखी अशाच अनवट पदार्थांची कृती येऊदे.