प्रवासीजी,
कौतुकाच्या या शब्दांबद्दल आभार. हे खरं आहे की गजल रचताना छंदाबद्दल मी अधिक सतर्क असतो, अशा प्रकारच्या कवितांबाबत नसतो.
पंचशर म्हणजे कामदेव उर्फ मदन. हिंदू धर्मानुसार त्याच्या भात्यात पाच बाण असतात म्हणून त्याला पंचशर म्हटले जाते.
ह्या कवितेत मला सर्वाधिक आवडलेल्या दोन पंक्ति तुम्हांसही आवडल्या हे वाचून माझी अवस्था "ह्याचसाठी केला होता अट्टाहास" अशी झाली .
पुन्श्च आभार.
आपला,
मिलिंद