खालील प्रकारे लेख/चर्चा/प्रतिसाद यांचे शुद्धलेखन तपासता येईल.

क)
प्रतिसाद आणि व्य. नि.-

१. प्रतिसाद/निरोप टंकीत करा.
२. 'गमभन' 'विषय' तपासत नाही. म्हणून ते शीर्षक प्रतिसाद/निरोप लिहायच्या जागेत सर्वात वर अथवा खाली टंकीत करा.
३. लिहिताना लुकलुकणारा निर्देशक (कर्सर) लिहायच्या खिडकीत नेऊन ठेवा.
४. याहू/गुगल च्या कळपट्टीची पॉप अप खिडक्यांना आडकाठी असेल तर काढा
५. मनोगत वर सगळीकडे टंकीत करण्याच्या जागांच्या उजवीकडे वर हे चित्र आहे. त्यावर टिचकी मारा. शुद्धिचिकित्सक चालू होईल.
६. डावीकडे वरच्या बाजूला गमभन सुचवण्या देईल. ज्या पटतील त्या घ्या बाकीच्या 'राहू द्या'.
७. 'झाले' वर टिचकी मारायला विसरू नका.
८. तपासून झाल्यावर 'शीर्षक' तिथून कापून 'विषय' इथे चिकटवा.
९. जोवर तुमच्या प्रतिसादाला कोणी प्रतिसाद देत नाही तोवर तुम्ही हे कितीही वेळा करू शकता. त्यासाठी ह्या प्रतिसादात फेरफार करा या चित्रावर टिचकी मारा. लेखनात हवे ते बदल करा आणि मुद्दा क्र.२ पासून पुढे जा.

===

ख)
नवीन लेख लिहिताना-

१. लेख लिहा
२. 'गमभन' 'विषय' तपासत नाही. म्हणून ते शीर्षक प्रतिसाद/निरोप लिहायच्या जागेत सर्वात वर अथवा खाली टंकीत करा.
३. लिहिताना लुकलुकणारा निर्देशक (कर्सर) लिहायच्या खिडकीत नेऊन ठेवा.
४. याहू/गुगल च्या कळपट्टीची पॉप अप खिडक्यांना आडकाठी असेल तर काढा.
५. मनोगत वर सगळीकडे टंकीत करण्याच्या जागांच्या उजवीकडे वर  हे चित्र आहे. त्यावर टिचकी मारा. शुद्धिचिकित्सक चालू होईल.
६. डावीकडे वरच्या बाजूला गमभन सुचवण्या देईल. ज्या पटतील त्या घ्या बाकीच्या 'राहू द्या'.
७. 'झाले' वर टिचकी मारायला विसरू नका.
८. तपासून झाल्यावर 'शीर्षक' तिथून कापून 'विषय' इथे चिकटवा.
९. 'प्रकाशित करण्यायोग्य' असे म्हणून प्रकाशित करा.

===

ग)
आधी लिहून ठेवलेला किंवा प्रकाशित केलेला लेख-

१. त्या लेखाच्या पानावर जा.
२.
    २क) जर प्रकाशित केलेला नसेल तर
    २ख) जर कोणी प्रतिसाद दिला नसेल तर
वर 'संपादन' अशी पाटी(टॅब) दिसेल, त्यावर टिचकी मारा.
३. लेख प्रकाशित करायच्या आधी ज्या पानावर होतात त्याच पानावर जाल.
४. लिहिताना लुकलुकणारा निर्देशक (कर्सर) लिहायच्या खिडकीत घेऊन जा.
५. याहू/गुगल च्या कळपट्टीची पॉप अप खिडक्यांना आडकाठी असेल तर काढा.
६. मनोगत वर सगळीकडे टंकीत करण्याच्या जागांच्या उजवीकडे वर  हे चित्र आहे. त्यावर टिचकी मारा. शुद्धिचिकित्सक चालू होईल.
७. डावीकडे वरच्या बाजूला गमभन सुचवण्या देईल. ज्या पटतील त्या घ्या बाकीच्या 'राहू द्या'.
८. 'झाले' वर टिचकी मारायला विसरू नका.
९. 'प्रकाशित करण्यायोग्य' असे म्हणून प्रकाशित करा.
१०. 'गमभन' 'विषय' तपासत नाही. म्हणून शीर्षक लिहायच्या जागेत सर्वात वर अथवा खाली टंकीत करा आणि तपासून झाल्यावर तिथून कापून 'विषय' इथे चिकटवा.
११. जोवर तुमच्या लेखनाला कोणी प्रतिसाद देत नाही तोवर तुम्ही हे कितीही वेळा करू शकता.