सचिनराव, बेंच मार्कला मापदंड असे म्हणता येईल असे वाटते.

वेदुताई, छान लिहिलेत हो. विश्लेषण चांगले केलेत.

मृदुला,

"तरीही तिला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. "

व्यक्तिस्वातंत्र्याच्या पाश्चात्य कल्पनांमुळे आपण काही वेळा अधिकाराची भाषा करताना दिसतो. पण परस्परपूरकतेवर वर आधारित असलेल्या आपल्या संस्कृतीत अधिकारापेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व आहे. मला समाजाकडून काय मिळाले ह्यापेक्षा मी समाजाला काय दिले ह्याचाच विचार श्री राम, आणि अखंड सौभाग्यवती सीता करताना दिसतात. त्यांनी समाजासाठी केलेला एवढा मोठा त्याग आमचा आदर्श बनून राहतो.

यादीच करायची झाली तर पहिल्या वनवासाला जायचा निर्णय सीतामाईने स्वतः घेतलेला होता. हरणाला पकडायला जायचा निर्णय पण तिने घेतलेला होता. रावणाला नाही म्हणण्याचा निर्णय तिचा होता. हनुमानाला नाही म्हणण्याचा निर्णय तिचा होता.

आणि 'जाया पती का दोन मानता? ' परस्पर सामंजस्य इतके असते की एकाने घेतलेला निर्णय दोघांचा मिळूनच असतो.

आपला
(एकजीव) प्रवासी