वेदश्री,प्रवासी आणि सचिन ह्यांच्या प्रतिसादात मृदुलाच्या लेखाचा उल्लेख येतो आहे.पण त्यांनी जो उतारा दिला आहे तो सुनिता देशपांडे ह्यांनी जी.ए.कुलकर्णी ह्यांना लिहिलेल्या पत्रातील एक भाग आहे.म्हणजे ते त्यांचे मत नाही असे आपण गृहीत धरावे का? आणि जर ते त्यांचे मत नसेल तर त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा करणे मला तरी ठीक वाटत नाही.
जर त्या सुनिताबाईंच्या मताशी विचारपूर्वक सहमत असतील तर त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हरकत नाही.
प्रवासीमहाशय आपले विचार अधिक मननीय आहेत.स्त्री-मुक्ती आणि पुरुष मुक्ती संघटनांच्या काळात असे परस्परपूरक जीवन जगण्याची दिशा देणारे विचार नक्कीच मननीय आहेत असे वाटते.