मृदुला,
चित्रातल्या भाजीला इथे, मस्कतमध्ये, 'कूसा' असे म्हणतात. दुधी कुटुंबातली वाटते. मुगाची डाळ, आमसूल, गूळ, काळा (गोडा मसाला) हळद, तिखट, मीठ घालून शिजल्यावर, वरून कोथिंबीर भुरभुरून, गरम गरम पोळी बरोबर, ही भाजी सुंदर लागते.