अंजू,
पाककृती चांगली आहे. अभिनंदन.
गाजराच्या पराठयांबरोबर दही किंवा लोणचे छान लागते.
साधे दही घेण्यापेक्षा मसाला दही घ्यावे मस्त लागते.
मसाला दही - कृती.
छान घट्ट कवडीचे दही वाटीत (कवडी न मोडता) घ्यावे.
त्यावर चाट मसाला, तिखट भुरभुरावे. वरून कोथिंबिरीची ३-४ पाने शोभेसाठी टाकावीत. चाट मसाला आवडत नसेल तर जिऱ्याची पावडर आणि तिखट वापरावे.
हे 'मसाला दही' वरील परोठ्यांबरोबर तसेच, मेथी ठेपले, पालक परोठा, आलू परोठा किंवा साधा परोठा (एवंच, कुठलाही परोठा) ह्यांच्या बरोबर घ्यावे. मजा येते.