मृदुला,
कूर्जेट चे चित्र दिल्या बद्दल धन्यवाद! काल इथल्या विश्व व्यापार केंद्रातील गोदरेज नेचर बास्केट मधे हे कूर्जेट झुकिनी या नावाने मिळाले. आज माहजूब करून पहिले. अप्रतिम. तुम्ही दिलेली पाककृती, क्रमवार मार्गदर्शन इतके अचूक होते की चुकायला वावच नव्हता! तुम्ही दिलेल्या प्रमाणात १५ माहजूब झाले. भाजी मात्र एका माहजूबाला कमी पडली. म्हणून एका गोळ्यात ऑम्लेट घालून करून पहिले. तेही झकास लागले. एक नवीन पदार्थ शिकायला व खायला मिळाल्याने आजचा दिवस माहजूबच्याच धुंदीत पार पडला.
छाया