पपई च्या बियांवर पाय पडल्यास आंधळेपणा येतो . (बुळबुळीत असल्याने घसरून पडल्यास मार अथवा जखम होऊ शकते म्हणून ??? )

याचा थोडा ओढून ताणून अर्थ 'काढायचा' प्रयत्न केला तर पपईतल्या 'अ' जीवसत्त्वाशी संबंध लावता येईल असे वाटते. म्हणजे पपई खाणे टाळू नये, अ जीवनसत्त्व कमी पडून डोळे कमजोर होतील. पण हा संबंध बादरायण संबंध ठरावा.

आमचे चुलते व्यवसायाने (ऍलोपथी) डॉक्टर आहेत. त्यांनी हा समज खोटा ठरवण्यासाठी पपईच्या बिया ओलांडल्या आहेत. अजूनही 'चाळीशी' वगळता नजर ठणठणीत आहे.

त्यामुळे पपईच्या बिया ओलांडण्याबाबतचा हा समज म्हणजे नुसते थोतांड आहे यावर पूर्ण विश्वास बसला आहे.