म्हणजे जर त्या कंपनीकडे जर माझी माहिती असेल तर ती त्यांना कोठून मिळाली असे मी विचारू शकतो का?

या परिस्थितीत मात्र तुमच्या माहितीवर तुमचा अधिकार असल्याने त्यांनाही माहिती कुठून मिळाली हे पाहणे महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा अशी माहिती एका कंपनी कडून दुसऱ्या कंपनीकडे हस्तांतरित केली गेली असण्याची शक्यता असते (आठवा करन बाहरी प्रकरण), तेंव्हा त्या मूळ कंपनीने तुम्हाला 'तुमची ही माहिती इतर उद्देशांसाठी न वापरण्याची' हमी दिली होती का याची खातरजमा करणे महत्वाचे ठरू शकेल.
अर्थातच हे सारे सिद्ध करणे किचकट असून त्या संबंधीच्या कायद्यांबद्दल(माहिती तंत्रज्ञान कायदा २०००?) तज्ज्ञच माहिती देऊ शकतील.

प्रत्येक ग्राहक-सेवादाता जोडीमध्ये एक प्रायव्हसी पॉलिसी लागू होते. सामान्यतः अतिशय बारीक अक्षरांत आणि एक/अनेक पाने भरून ही पॉलिसी असते. ही आपण कधी कधी प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे मान्य करतो. कोणतीही सेवा घेतली (मोबाईल, इंटरनेट) की त्याबरोबर ही पॉलिसी इतर कागदपत्रांबरोबर आपल्याला पाठवणे अपेक्षित असते. किंवा आलेल्या पत्रात ही माहिती कशी मिळवायची याची माहिती असते. कोणत्याही ग्राहकाची खाजगी आणि/किंवा वैयक्तिक स्वरूपाची माहिती कोणतीही कंपनी या प्रायव्हसी पॉलिसी च्या अखत्यारीत राहून इतर कंपन्यांना देऊ शकते.

स्वतःबद्दलची कोणती माहिती गोळा करून ती का आणि कोणत्या प्रकारे वापरली जाते हे जाणून घेण्याचा हक्क ग्राहकांना असतो/असावा.