धन्यवाद,
माझा मुद्दा असा आहे की मला एक मोबाईलवर फोन आला होता. त्या क्रेडिट कार्ड कंपनीला(जिचा मी ग्राहक नाही) माझे नाव आणि माझे ऑफिसचे नाव माहित होते. त्यांनी मला नवीन कार्ड करीता अर्ज करण्यास सांगितले. मी त्यांना विचारले की त्यांना माझी माहिती कोठून मिळाली तर त्यांनी प्रथम नकार दिला. नंतर मी त्यांना सारखे विचारल्यावर त्यांनी सांगितले की ती माहिती त्यांना माझ्या मोबाईल कंपनीने दिली. परंतू माझ्या मोबाईल कंपनीने सांगितले की ते अशी माहिती देत नाहीत.
मग त्या क्रेडिट कार्ड कंपनीकडे ती माहीती कोठून आली? आणि माझ्या आठवणीप्रमाणे मी त्या क्रेडिट कार्ड कंपनीला माझी ही माहिती कधीच नव्हती दिली. माझ्या मोबाईल कंपनीने मला पुरावा मागायला सांगितला की ती माहिती माझ्या मोबाईल कंपनीने दिली.
कोणीतरी एक(म्हणजे दोघांपैकी एक कंपनी) मला चुकीचे सांगत आहे.
ह्या बाबतीत मी काय करावे?
-देवदत्त