भूतकाळाचा आणि भूतकाळातील समाजाचा अभ्यास करताना,त्यावर भाष्य करताना इतिहासकारांसाठी व समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी सर्वात पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम असतो : आजच्या काळाचे आणि आपल्या समाजाचे निकष व मापदंड त्या काळाला,त्या व्यक्तिंना व त्यांच्या कृतींना लावू नये.त्यांचा वस्तुनिष्ठपणे त्या काळाची सामाजिक स्थिती कशी होती हे जाणून विचार करावा."Judge not that ye be judged."आजपासून दोन हजार वर्षांनंतरच्या लोकांनी आपले मुल्यमापन तेंव्हा ज्या अस्तित्वात असतील त्या रुढींनुसार केल्यास आपल्यापैकी किती महाभाग महापुरुष/स्त्री ठरतील हा विचार प्रत्येकाने करावा आणि उत्तर स्वतःच्या मनास द्यावे.

आपला (भोचक),

छिद्रान्वेषी