देवदत्तराव,
प्रथमदर्शनी तुमची मोबाईल कंपनीने माहिती दिली आहे असे वाटते. तुमची-आणि-मोबाईल कंपनी यांच्यातली प्रायव्हसी पॉलिसी तपासा. त्यात तुम्ही त्यांना अशी माहिती 'वाटण्याची' परवानगी दिली होती का ते पाहा. जर का तुम्ही अशी परवानगी दिली नसेल तर मोबाईल कंपनीला जाब विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे असे वाटते.
कारण तुमची जन्मतारीख आणि इतर माहिती तुमची आणि फक्त तुमचीच आहे. ती माहिती तुमच्या परवानगी शिवाय इतर कोणाला देणे ही तुम्ही तुमची माहिती गोपनीय ठेवण्याच्या हक्काची पायमल्ली आहे.
त्या क्रेडिट कार्ड कंपनीला फोन/अर्ज करून सांगा की तुमची माहिती त्यांनी 'खोडून' टाकावी तसेच इतर कोणात्याही कंपनीला (त्यांची स्वतःची दुसरी कोणतीतरी किंवा त्र्ययस्थ) देऊ नये. सही केलेले छापील पत्र भविष्यकाळात उपयोगी ठरेल.