रामायण ही 'त्या' काळातली गोष्ट आहे, त्यावेळची सामाजिक परिस्थिती वेगळी, संदर्भ व पेच निराळे हे मान्य केले म्हणजे आजच्या काळाला 'आदर्श' वा दिशादर्शक म्हणून त्याचा फारसा उपयोग नाही हे मान्य करायला काहीच प्रत्यवाय नसावा.
एकदा ते केले म्हणजे मग सीता किंवा राम कसेही वागले तरी त्यांना किंवा वाल्मिकींना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचीही गरज नाही आणि वकिली करायचीही नाही.
पण तसे आपण मान्य करतो का? माझ्या मते नाही. म्हणून ही सर्व चर्चा अर्थपूर्ण आहे. कोणत्या गोष्टी आदर्श मानायच्या व कोणत्या गाळायच्या हे ठरवण्यासाठी.
भास्कर.