श्रावणी,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
मसूर डाळीचा अजून एक गुणधर्म म्हणजे ह्या डाळीने आम्लपित्त (ऍसिडिटी) वाढत नाही.
सुवर्णमयी,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
करून पाहा. साधी आणि सोपी आहे.
माधव,
दाल फ्राय व जिरा फ्राय राईस - सोबत लिंबाचे खारटसे लोणचे- एखादी मिरची व पापड तळून
अबबब...! अरे शिंच्या प्रंत्येंकांत तेंल तें किंतीं रेंऽऽऽऽ! अशांनं वजंन घंटांयंचें कंसें तुंझेंऽऽऽऽऽ! नुंसतें जिंभेंचें चोंचंलें बंरें नंव्हें रेंऽऽऽ!
असो. माधवा, भावना पोहोचल्या. धन्यवाद.
संयुक्ता,
पण नुसता तळलेला पापड असण्यापेक्षा मसाला पापड असेल तर मजा आणखी वाढेल असं वाटतं. तसंच दही-बुंदी सारखे काहीतरी तोंडी लावणे म्हणून याबरोबर
घ्यांऽऽऽ! अगों तुझ्या कांकांचे डोंकें फिंरलेंलें दिंसंतें म्हणावें तंर तूं त्यांच्यांहीं दोंन पांवलें पुंढेंच म्हंणंतों मींऽऽऽ! जेंवणांच्यां प्रंत्येंक पदांर्थांत एंवंढें तेंल नसांवें होंऽऽऽ! .........म्हंणून लिंहिंलें, रांग मांनूं नंकोंस होंऽ!
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. चेष्टा नाही. खरेच सांगतो. दाल फ्राय असेल तर बाकीच्या पदार्थांत अत्यल्प तेल असावे किंवा अजिबात नसेल तर उत्तमच. जास्त तेल प्रकृतीस अहितकारक. माझ्या सर्व पाककृती प्रकृतीस हितकारकच असतात असा माझा दावा नाही तरीही मेनू बनविताना मी ह्या गोष्टींची काळजी घेतो. (तरीही वजन घटत नाही हे अलाहिदा)
लोकहितवादी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद. करून पाहा आणि कशी झाली हे व्य. नि. तून कळवा.