छान !!! पिलाशी खेळतानाचे तुझे अनुभव वाचताना खूप मजा आली.. आणि शेवट वाचल्यावर कसंतरी झालं..
लेख वाचताना मी ज्यांच्याबरोबर खेळले ती सगळी मांजरे आठवली. उचलून घेतल्यावर तुझ्या अनुभवाप्रमाणे सरसर खांद्यावर चढणारी पिले आणि कुठल्यातरी आजाराने सतत स्वतःभोवती गिरक्या घेत राहणारं एक अशक्त पिलू.. चिमण्यांना मारायला जाणाऱ्या मांजराच्या मी दिलेली थोबाडीत.. पहाटे पहाटे पांघरुणात येऊन झोपणारे पिलू.. आळशी आणि घाबरट कापशा नावाचे पिलू.. छे ! प्राण्यांना जीव लावू नये हेच खरे !