राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर तसेच पर्यावरणावर सकारात्मक परिणाम

हे मत कुठे वाचायला मिळेल?

मी याविषयातली जाणकार नक्कीच नाही. तरी तर्कदृष्ट्या असे वाटते, कि एखाद्या प्राण्याचा उपयोग करण्याला मनाई केली तर त्या प्राण्याचे उत्पादन आपोआपच कमी होईल. म्हणजे दुधासाठी लोक गाय न पाळता म्हैस पाळतील. जेणेकरून दूधासाठीची तिची उपयुक्तता कमी झाल्यावर मांस, कातडी या भागांचा उपयोग करून घेता येईल. गाई कमी झाल्यावर गाईचे दूध आपोआप महाग होईल. (मागणी पुरवठ्याचा नियम) शेतीसाठी बैल वगैरे वापरण्याचा काळ हळूहळू मागे पडतो आहे, तेव्हा, त्या दृष्टीनेही गाय 'उपयुक्त पशू' राहणार नाही.

स्वीडनमध्ये गाईच्या निरुपयोगी भागांपासून इंधन तयार केले जाते असे काल एका बीबीसीच्या कार्यक्रमात बघितले. तसे काही केल्यास पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल असे वाटते. अर्थात गोहत्याबंदी असल्याने ते शक्य होणार नाही.