मला तरी हा विनोद छान वाटला बुवा! विटंबनेचेच म्हणाल, तर ज्यांना विटंबनाच शोधायची आहे, त्यांना सगळ्यातच विटंबना दिसेल. जसे, आचार्य अत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे (किंवा आचार्य अत्र्यांच्या नावावर "मी अत्रे बोलतोय" मध्ये सदानंद जोशींनी म्हटल्याप्रमाणे), मराठी भाषेतील "आहे" आणि "नाही" हे दोन शब्द सोडल्यास कोणत्या शब्दाचा अश्लील अर्थ काढता येत नाही? (माझे वक्तव्य: काढायचाच झाल्यास "आहे" आणि "नाही"चासुद्धा काढता येतो.) आणि विनोदाच्या दर्ज्याबद्दलच बोलायचे झाल्यास, मला वाटते की हा मुद्दा व्यक्तिसापेक्ष आहे. असो.

तात्पर्य काय, की मला तरी हा विनोद आवडला. आणि मला वाटते, की ज्यांना आवडला, त्यांनी हसावे; ज्यांना नाही आवडला, त्यांनी सोडून द्यावे. उगाच विश्लेषण करत बसू नये.

- टग्या.