मृदुलादेवी,
राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर तसेच पर्यावरणावर सकारात्मक परिणाम
हे मत कुठे वाचायला मिळेल?
इथे पाहा. हे केवळ एक उदाहरण झाले. ह्याच संकेतस्थळावर इतर दुव्यांमध्ये बरीच माहिती आहे.
तर्कदृष्ट्या असे वाटते, की एखाद्या प्राण्याचा उपयोग करण्याला मनाई केली तर त्या प्राण्याचे उत्पादन आपोआपच कमी होईल.
उपयोग आणि उत्पादन ही भांडवलशाहीची भाषा वाटते. गायीचे संस्कृतीतील स्थान बघता तिच्याकडे केवळ एक उत्पादन म्हणून पाहिले जाऊ नये असे वाटते.
तरीही उपयोगाच्या भाषेत बोलायचे झाले तर - ठार मारणे हा काही गायीचा एकमेव उपयोग नाही. नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत गायीचे जिवंत असणे अधिक श्रेयस्कर आहे.
उलट अवेळी जीव घेण्याचे प्रमाण वाढत गेले तर गायींची लोकसंख्या कमी होण्याचा धोका आहे.
स्वीडनमध्ये गायीच्या निरुपयोगी भागांपासून इंधन तयार केले जाते असे काल एका बीबीसीच्या कार्यक्रमात बघितले. तसे काही केल्यास पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल असे वाटते. अर्थात गोहत्याबंदी असल्याने ते शक्य होणार नाही.
आपण दिलेल्या दुव्यानुसार ही योजना जैविक वायू (बायोगॅस) वर आधारित दिसते. त्याचा गायीला ठार मारण्याशी संबंध वाटत नाही. गायींना ठार मारून वायू घेत असतील तर ते पर्यावरणाचे नुकसानच ठरेल. अर्थात शेणाचा इंधन म्हणून वापर सर्वपरिचित आहे आणि त्यात पर्यावरणाचे कल्याणच आहे ह्यात शंका नाही.
आपला
(पर्यावरणी) प्रवासी