तेलात आणि तुपात उष्मांक तेवढेच की नाही ते मला माहीत नाही. परंतु तुपात संपृक्त मेद (सॅच्युरेटेड् फॅट्स) असतात, जे तेलात नसतात. आणि संपृक्त मेद हे कोलेस्टेरॉलवृद्धीच्या दृष्टीने (आणि पर्यायाने हृदयाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने) वाईट. पर्यायाने तूप हे हृदयाकरिता तेलापेक्षा अधिक वाईट.

अर्थात मेदवृद्धी/कोलेस्टेरॉलवृद्धी/अतिवजन या अथवा संबंधित प्रकृतिसमस्या नसतील, तर मर्यादित प्रमाणात दोन्ही खाल्ल्याने काही बिघडू नये म्हणा!

(अर्थात ही माझी सामान्य माहिती आहे. मी या विषयातील तज्ज्ञ नाही, तेव्हा चूभूद्याघ्या. आणि तज्ज्ञांनी खुलासा करावाच.)

- टग्या