सुंदर लेखन. लेखिकेची संवेदनशीलता वाखाणण्याजोगी आहे.
नंतर कधीतरी विरहाचे दुःख होते किंवा सदनिका संस्कृतीत प्राणी पाळण्यास मर्यादा बसतात त्यामुळे आपण सहसा, आवडलेला, प्राणी घरी आणून ठेवत नाही. (त्यातून घरातल्या सर्वांचे एकमत .... अशक्यच.) पण, रस्त्यातून जातानाही एखादे मांजरीचे अथवा कुत्र्याचे गोजिरवाणे पिल्लू दिसले की पाय हमखास घुटमळतातच.

श्री. प्रवासी,

मुद्दामच जाहीर प्रतिसादात लिहीत आहोत कारण ही विनंती आपल्यासाठी कमी आणि आपल्या लेखाहून अधिक - प्रचंड - अवाढव्य लांबीचे लेखन करणाऱ्या मनोगतींसाठी अधिक आहे.

मनातील आशय शब्दबद्ध करताना कधी कधी कथावस्तू, आपल्या निकषांवर, 'प्रचंड' मोठी होते. फक्त ती कंटाळवाणी होणार नाही एवढी खबरदारी घ्यावी लागते. आपण सर्वच जणं 'हौशी' लेखक आहोत. हातून कधी चूक झाल्यास चोखंदळ वाचकांनी जरूर नजरेस आणून द्यावी. चुका समजल्या तर सुधारता येतात. लेखकाने/लेखिकेने 'पालीची' ओढून-ओढून 'मगर' करण्याचा प्रयत्न करू नये. पण, समर्थनीय असेल तर, विस्तारभयास्तव, मुद्दे फुलण्याआधीच आवरतेही घेऊ नयेत.
असो.