अनु,
कथा आवडल्याचे कळवले होतेच- आता तीच्या लांबीवर जरा लिहावे- मी कथा लिहिलेल्या आहेतच - राधिकेच्या, प्रभाकरांच्या, तुझ्या, सोनालीच्या, अलीकडील तात्या व जयन्ता५२ व अनेक इतर लेखकांच्या (मनोगतावरील/बाहेरील) कथा वाचण्यात आलेल्या आहेत.
माझ्या मते प्रवासी महोदयांचा मूळ मुद्दा एकूण कथेची लांबी हा नसून विषयाच्या चघळण्यावर असावा (कृपा करून कोणी ह्या वाक्याची जोड अनुच्या वरील कथेला देऊ नका) कीर्तन व कथा ह्यांत फरक तो हाच आहे. कीर्तनकार एखादा छोटासा प्रसंग चावून चावून त्याचा चोथा होईपर्यंत समजवण्याचा प्रयत्न करतो. तर कथाकार प्रसंगाला महत्त्व न देता, आशय व भावना वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो (अर्थात हे माझे मत आहे)
एकंदरीत प्रवासी महोदयांचा मुद्दा लक्षात घेता आपण सर्वांनीच ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, वाचकाला आशयाशी कर्तव्य असते -
'तो आला, मग त्याने चपला काढल्या, मग तो सोफ्यावर बसला. थोडा वेळ झाल्यावर उठून उभा राहिला, पाणी प्यायला, पंखा लावला व परत बसला' ह्या पद्धतीचे लेखन नक्कीच वाचकांना कथेपासून दूरच नेईल. रटाळ लेखनामुळे वाचक कथेपासून दूर जाईल ह्याची जाणीव आपण नाही ठेवली तर उरले सुरलेले कथा-वाचकही दूर जातील.
हे आपल्या सर्वांसाठीच आहे. कथा छान आहे व आवडली हे परत एकदा आवर्जून सांगतो. कथेची लांबी पण सुयोग्य आहे ( आता येथे प्रतिसादांवर प्रतिसाद मिळून ती ताणली गेली तर वाढेल !) तेव्हा 'चलने दो'