मांसासाठी गाई/बैलांना एका यंत्रात कापतात. त्यात आतडी, कोठा असे भाग आपोआप वेगळे केले जातात व कचरा म्हणून टाकून दिले जातात. ह्या कचऱ्यातून इंधन निर्माण करण्याची यंत्रणा स्वीडीश लोकांनी बांधली आहे. तिथे ५ ते ६ टक्के गाड्या (कार) असले इंधन वापरतात. त्यांनी अश्या इंधनावर चालणारी आगगाडी बनवली आहे, म्हणून बीबीसीने बातमी दिली.
त्याच बातमीत असेही सांगितले कि युरोपीय संघाच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे येत्या ३ (बहुधा) वर्षात आख्ख्या युरोपात (इंग्लंड धरून!) किमान ३.७५% गाड्यांनी असे अपारंपारिक इंधन वापरावे. आणखी असे सांगितले की या तंत्रज्ञानासंदर्भात चीनी लोकांनी स्वीडनशी देवाणघेवाणीचा करार केला आहे!