आपण दिलेल्या माहितीवरून हे लोक इंधनांसाठी गायी मारत नाहीत असे दिसते. खाण्यासाठी मारतात व त्यातून उरलेल्या गोष्टींचा इंधनासाठी वापर करायचा प्रयत्न करतात असे दिसते. अर्थात ह्या देशांतही पर्यावरणाच्या व विशेषतः संस्कृतीच्या समस्या इतक्या गंभीर आहेत की त्याविषयी येथे न बोललेलेच बरे.
सुदैवाने भारतात अन्नधान्याचे मुबलक उत्पादन होते. गायी मारून खायची वेळ आपल्यावर आलेली नाही. आणि गायी मारत नसल्यामुळे त्यातून उरणाऱ्या अवयवांचे काय करायचे हा प्रश्न आपल्याला भेडसावत नाही.
किमान ३.७५% गाड्यांनी असे अपारंपरिक इंधन वापरावे.
अपारंपरिक इंधनाचे अनेक प्रकार आहेत. उदा० समुद्राच्या लाटांपासून ऊर्जानिर्मिती, नैसर्गिक वायू इत्यादी. ह्या ३.७५ टक्क्यांत ह्या सर्वाचा समावेश होत असावा असे वाटते. गायी मारणे हा त्यावरील उपाय नाही.
आपला
(असहमत) प्रवासी