एका गावात एक माणूस विहीरीत पडून मेला. चौकशीकरीता पोलिस आले. संशय हा की त्याला मारून विहिरीत टाकण्यात आले. त्यांनी एका माणसाला विचारले.
पोलिसः हा माणूस विहीरीत पडून मेला. कशावरून?
माणूसः विहीरीच्या कठड्यावरून.
पोलिसः अहो, तसे नाही हो. हा माणूस विहीरीत पडूनच मेला, ह्याला पुरावा काय?
माणूसः अहो, हा माणूस हिंदू आहे. ह्याला पुरावा नाही.. ह्याला जाळावा.