--आपल्याला आवडणाऱ्या मैत्रिणीला फक्त आपणच आवडावे असे कवी का गृहीत धरतोय?

--चांगला नवरा आपणही होऊ शकलो असतो हा आत्मविश्वास योग्य पण  'आम्ही काय मेलो होतो' हा अट्टहास, दुराग्रह वाटतो.

-- आपली टेम्पररी नोकरी एवढ्या एकाच कारणास्तव तिने आपल्याला नाकारले हेही आपणच ठरवितो?

--तिच्या नवऱ्यात आपल्याला काही(हि) दिसत नसले तर तिने त्याच्याशी 'उगीचच' लग्न केले असावे का? तिची (आवड,बुध्दी व )'निवड' केवळ 'आपण नाही' म्हणून ती सामान्य (किंवा हीन) आहे ठरवणारे आपण कोण?

-- 'तू मित्र म्हणून चांगला आहेस पण 'नवरा' म्हणून माझ्या अपेक्षांमध्ये बसत नाहीस' हे वाक्य आपण पुरुष का समजू व स्वीकारू शकत नाही?

थोडक्यात,तिचीही बाजू ,जी काय असेल ती समजून न घेता, तिला 'बेवफा' किंवा 'अपरिपक्व' म्हणणे 'प्रॉसीक्युटर ही मीच व जज्ज ही मीच' ही भूमिका घेण्यासारखे आहे.

-- महिलावर्गाकडून प्रतिसाद न येण्याचे हेहि एक संभाव्य कारण असू शकेल?

जयन्ता५२