बराहा बरोबर येणारे "बराहा डायरेक्ट" नावाचे एक हत्यार वापरून कुटेही देवनागरी लिहिण्याची सोय आहे. खाली दिलेले चित्र पाहा.

पायऱ्या अश्या
- बराहा डायरेक्टच्या आयकन वर टिचकी (एक किंवा दोन, चवीनुसार;) मारा
- संगणक फलकाच्या खालील-उजव्या कोपऱ्यात (जिथे सामान्यतः घड्याळ असते) बराहा डायरेक्ट चे चिह्न दिसेल.
- F12 कळ दाबली असता वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे "बराहा डायरेक्ट युटिलिटी" ची खिडकी उघडेल.
- त्यात "इंडियन लँग्वेज" आणि "आउटपुट फॉरमॅट" निवडा.
- मनोगतावर जसे ctrl+t ने आपण इंग्लिश-मराठी उडी मारतो तसे इथे F11 कळ दाबल्याने होईल.
- आता ओपनऑफिस रायटर (किंवा वर्ड, किंवा कोणतीही युनिकोड ओळखणारी प्रणाली) ची खिडकी उघडून थेट मराठीत लिहायला सुरू करा!
- माझ्याकडील
विंडोज डब्यावर भारतीय भाषासंच इंस्टॉल नाही त्यामुळे नोटपॅड मध्ये
जोडाक्षरे, वेलांट्या बरोबर दिसत नाहीत. पण ओपनऑफिस मध्ये अगदी आरामात
मराठीत लिहू आणि सुरक्षित करू शकतो.
चला तर मग. वापरा आणि कळवा.
आपला,
(प्रयोगशील) शशांक